बनाना मिल्क शेक पिण्याचे हे आहेत फायदे...
सकाळी कामाच्या गरबडीत तुम्हीही न्याहारी करायचं टाळता का? उत्तर होय असेल तर तुमची ही सवय त्वरीत बदलण्याचा प्रयत्न करा. ही सवय अशीच तर बदलणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील... आणि यासाठी तुमच्यासाठीच आहे हा एक सोप्पा उपाय...
मुंबई : सकाळी कामाच्या गरबडीत तुम्हीही न्याहारी करायचं टाळता का? उत्तर होय असेल तर तुमची ही सवय त्वरीत बदलण्याचा प्रयत्न करा. ही सवय अशीच तर बदलणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील... आणि यासाठी तुमच्यासाठीच आहे हा एक सोप्पा उपाय...
तुम्हाला जर नाश्ता करायला वेळ नसेल तर 'बनाना मिल्क शेक' मात्र फटाफट तयार होऊ शकतो... आणि तुमच्या शरीराला पोषक असाही हा नाश्ता ठरू शकतो. यामुळे, तुम्हाला लवकर भूकदेखील लागणार नाही.
बनाना मिल्क शेक पिण्याचे फायदे...
१. केळांमध्ये पॅक्टीन नावाचं फायबर आढळतं... पाचनतंत्र व्यवस्थित राखण्याचं काम हे फायबर करतं. सोबतच बनाना मिल्क शेक पिणाऱ्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवत नाही.
२. दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते... केळी आणि दुधामुळे तुमची ही आवश्यकता पूर्ण होते.
३. दूधात असलेल्या कॅल्शिअममुळे हाडांना मजबुती मिळण्यास मदत होते.
४. बनाना मिल्क शेकमध्ये असलेलं विटामिन बी-६ रक्त पुरवठा सुरळित ठेवतं.
५. दूधात असलेलं विटॅमिन ए इम्युनिटी सिस्टम स्वस्थ ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.