मुंबई : सुंदर, नितळ, गोरी त्वचा कोणाला नको असते. यासाठी लोक चेहऱ्यावर विविध प्रयोग करत असतात. मात्र कांदा आणि लसूणचा फेसपॅक तुम्ही कधी ट्राय केलाय का?


त्वचेसाठी वरदान आहे कांदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कांद्यामध्ये अनेक व्हिटामिन असतात. याशिवाय अँटीऑक्सिडंट्सही असतात. कांद्याच्या रसात अँटी सेप्टिक, अँटी-बॅक्टेरियल यासारखे गुण असतात. ज्यामुळे त्वचेवरील मुरुमे निघून जातात. 


कसा करावा वापर


तुम्ही रोजच्या डाएटमध्ये कच्च्या कांद्याचा वापर करु शकता. कांदा त्वचेसाठी चांगला. याशिवाय तुम्ही कांदा किसून त्याचा फेसपॅक बनवून वापरु शकता. तसेच कांदयाच्या रसाचाही वापर करु शकता. 


त्वचा उजळण्यासाठी लसूण फायदेशीर


लसूणमध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन बी६, सेलेनियम, झिंक असते.  त्वचेवरील मुरुमे हटवण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. लसणाच्या पेस्टमध्ये मध मिसळून हा पॅक लावल्यास चेहऱ्यास फायदा होता. पिंपल्सच्या जागी लसूणचा रस लावा पिंपल्स लवकर बरे होतील आणि डाग राहणार नाहीत.