मुंबई : गरम पाणी पिणे अनेकांना आवडत नाही. मात्र, थंडगार पाणी पिण्याला प्राधान्य दिले जाते. थंड पाणी पिणे आरोग्याला हानिकारक असते. त्यामुळे नेहमी सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यवर्धक असते. तसेच याचे खूप सारे लाभ मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. ताब्याच्या भांड्यात रात्री पाणी ठेवून त्याच भांड्यात सकाळी पाणी गरम करुन ते प्यायल्यास गरम पाण्याचे खूप फायदे होतात.


२. तुमच्याकडे तांब्याचे भांडे नसेल तर साधारण भांड्यात पाणी गरम करुन पिणे आरोग्याला चांगले असते. सकाळी ५ ते ६ वाजता जितके गरम पाणी पिता येईल तितके पिणे चांगले. किमान चार ते पाच ग्लास पाणी पिणे चांगले असते.


३. काहींना गरम पाणी पिण्यास आवडत नाही. अशावेळी गरम पाण्यात चहा पत्ती टाकून प्या.


४. गरम पाण्यात लिंबू पिळून पाणी प्या. सकाळी अर्ध लिंबू पिळून पाणी प्यायल्यास चांगले. त्यामुळे पचन प्रक्रिया (Metabolism) चांगली राहते. तसेच वजन कमी होण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरातील टाकावू पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.


५. गरम पाण्यात लिंबाचा रस, आले रस, काळीमिरीची पावडर, थोडी मध टाकून पिणे एकदम चांगले. 


६. गरम पाणी प्यायल्यामुळे कफ समस्या दूर होण्यास मदत होते. कफ बाहेर पडतो. तसेच चेहरा चांगला राहतो. ब्लड सर्क्यूलेशन चांगले होते. चर्बी कमी होण्यास मदत होते.


७. तीन चार ग्लास गरम पाणी पिण्यामुळे पोट साफ होते. तसेच पाण्यात मीठ टाकून पिण्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असते. तसेच केस अधिक काळे होतात. कोंडा नष्ट होण्यास मदत होते.