मुंबई : ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे सोपे असते. मात्र ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी डाएट प्लान बनवणे कठीण असते. हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचे असल्यास योग्य प्रमाणात प्रोटीन, व्हिटामिन तसेच फायबर, मिनरल्स यांचे सेवन गरजेचे असते. त्यासाठी खालील डाएट प्लान फिक्स करा आणि बॉडी बनवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रेकफास्ट - सकाळचा ब्रेकफास्ट हा राजासारखा असावा. त्यासाठी ब्रेकफास्टमध्ये एक ग्लास कोमट दूध/एक कप चहा/एक कप कॉफी/ ताजा रस यासोबत एक प्‍लेट पोहा/उपमा, दोन अंडी आम्लेट/दोन उकडलेली अंडी अथवा जॅम वा बटरसोबत तीन ब्राउन ब्रेड स्लाइस. 


दुपारचे जेवण - दुपारचे जेवण हे सर्वसमावेशक असावे. यात गोड दही एक वाटी, 2-3 चपाती, एक वाटी भात, हिरव्या भाज्या , डाळ, सलाड


संध्याकाळचे स्नॅक्स - दुपारचे जेवण योग्य वेळेत घेतल्यास संध्याकाळच्या सुमारास थोडीफार भूक लागतेच. अशावेळी जड पदार्थ खाण्यापेक्षा दोन स्लाईस ब्राऊन ब्रेड तसेच एक ग्लास बनाना शेक/कस्टर्ड अॅपल/ मँगो शेक अथवा एक कप चहा/कॉफी घेऊ शकता.


रात्रीचे जेवण - रात्रीचे जेवण फार कमी घ्यावे. रात्रीच्या जेवणात एक बाऊल दही, तसेच 1-2 चपात्या, सुकी भाजी, एक बाऊल डाळ, एक प्लेट सलाड. रात्री जेवल्यानंतर 15-20 मिनिटानंतर मीठ आणि साखरेशिवाय कोमट लिंबूपाणी प्यावे. 


तसेच जेवल्यानंतर दोन ते अडीच तासांनी झोपावे. कारण या काळात जेवण चांगले पचते. तसेच पाचनसंबंधीत समस्या दूर होतात.