मुंबई : उन्हाळ्यात थंड खाण्याचा सल्ला दिला जातो. तर तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन करु नये, असा सल्ला डॉक्टर, आहार तज्ज्ञ देतात. उन्हाळ्यात जास्त करुन थंड पदार्थ खाणे योग्य असते. यात दहीचा समावेश होतो. दही खाण्याचे खूप लाभ आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात दही खाण्याने शरीराचे तापमान संतुलित राहते. तसेच पचन क्रिया चांगली राहते. दहीमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन तसेच शरीराला पोषक तत्व मिळतात. असे असले तरी दही केव्हा खावे याचा मापदंड आहे. आपल्याकडे रात्रीचे दही खाणे योग्य मानले जात आहे. मात्र, याशिवाय दही खाण्याचे काही नियम आहेत, ते आपल्याला माहित हवेत.


१. ज्यावेळी आपल्याला लवकर सर्दी-पडसे होत असेल तर तुम्ही रात्रीचे दही खावू नये. त्यामुळे यात वाढ होण्याचा धोका जास्त असतो.


२. तुम्ही दिवसा दही खात असाल तर त्यात साखर घालू नको. जर तुम्हा रात्रीचे दही खाण्याची सवय असेल तर त्यात काही प्रमाणात काळीमिरी घाला.


३. मासे, मटन खाताना दही खाऊ नये.