जेवणानंतर या ३ गोष्टी करणं टाळा
जेवनानंतर काही गोष्ट करणे आपल्या शरिरावर परिणाम करतात. आपल्याला त्या गोष्टी बऱ्याचदा माहित नसल्याने आपण ते करून जातं. पण कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.
मुंबई : जेवनानंतर काही गोष्ट करणे आपल्या शरिरावर परिणाम करतात. आपल्याला त्या गोष्टी बऱ्याचदा माहित नसल्याने आपण ते करून जातं. पण कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे त्यासाठी खालील गोष्टी लक्षात ठेवा.
१. फळे खाणे : जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक मानले जाते. तरीही तुम्हाला हव्या त्या वेळी तुम्ही फळे खाऊ नका. प्रामुख्याने जेवणानंतर फळे खाल्याने पोट फुगू शकते. जेवणाआधी एक तास किंवा जेवणानंतर दोन तासांनी फळे खाणे योग्य असू शकतं.
२. चहा : जेवणानंतर लगेचच चहा पिऊ नका. चहाचा आम्लधर्मी स्वभाव आणि जेवणातील प्रथिने यामुळे पचनसंस्थेची प्रक्रिया बिघडते. यामुळे बद्धकोष्टता होऊ शकते.
३ : जेवणानंतर लगेच आंघोळ करणे देखील चुकीचे आहे. आंघोळीदरम्यान रक्तप्रवाह हात आणि पाय यांच्याकडे वेगाने प्रवाहित होतो. यामुळे पचनासाठी आवश्यक रक्त पोटापर्यंत पोहचत नाही आणि पचनाची प्रक्रिया मंदावते. जेवणानंतर लगेच झोपणेही चांगले नसते. यामुळे जठराशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.