मुंबई : 24 आठवड्यांच्या गर्भ असलेल्या महिलेला गर्भपात करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिलीय. त्यानंतर आता गर्भपाताची मर्यादा वाढवण्याच्या मागणीला जोर मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर प्रकरणात गर्भामध्ये दोन्ही किडन्या नसल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर अशा गर्भामुळे महिलेच्या जीवाला धोका असल्याच्या आधारावर सुप्रीम कोर्टानं गर्भपाताला परवानगी दिलीय. भारतामध्ये फक्त 20 आठवड्यापर्यंतच गर्भपात करता येतो, त्यानंतर मात्र गर्भपाताला परवानगी नाही. पण 20 आठवड्यानंतर गर्भामध्ये व्यंग आढळलं तर प्रत्येक वेळेला सुप्रीम कोर्टाच्या दारात जावं लागतं.


या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्या महिलेला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. त्यामुळे कायदा करुन गर्भपाताची ही मर्यादाच वाढवावी, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे.


यासंदर्भात डॉ. निखिल दातार यांनी सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी...