मुंबई : पाण्याला जीवन म्हटले जाते. मात्र दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे याचेही काही नियम असतात. डॉक्टर तसेच न्यू्ट्रिशियन्स दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमचे वजन किती आहे यावर किती पाणी प्यावे हे प्रमाण असते. म्हणजेच ५० किलो वजन असलेल्या व्यक्तींचे पाणी पिण्याचे प्रमाण ८० किलोच्या व्यक्तीपेक्षा वेगळे असते. दोन्ही व्यक्तींच्या शरीराला पाण्याची गरज वेगवेगळी असते. 


तुमचे वजन जाणून घेतल्यानंतर त्याला ३०ने डिवाईड करा. म्हणजेच तुमचे वजन ६० किलो असेल तर तुम्हाला दिवसातून दोन लीटर पाणी पिणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या वजनाच्या व्यक्तींचे पाणी पिण्याचे प्रमाण वेगळे असेल. व्यायाम करताना तुम्ही किती वेळ करता, किती प्रमाणात घाम तुमच्या शरीरातून बाहेर निघतो यावरही पाणी पिण्याचे प्रमाण अवलंबून आहे. व्यायामामुळे शरीरातून मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे व्यायामानंतर दर अर्ध्या तासाला एक ग्लास पाणी प्यावे.