मुंबई : थंडीच्या दिवसांत तीळ खाणे शरीरासाठी फायदेशीर असते हे तर आपण जाणतोच मात्र त्याचबरोबर याच्या सेवनाने मेंदूची ताकदही वाढते. नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका संशोधनातून ही माहिती मिळालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीळामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स, मॅग्नेशियम, आर्यन आणि कॉपरसह अनेक खनिजे असतात. 


शोध रिपोर्टनुसार तीळ खाल्ल्याने मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. यातील लिपोफोलिक अँटीऑक्सिडंट आपल्या मेंदूवर वाढत्या वयाचा परिणाम होऊ देत नाही. वृद्धापकाळात स्मरणशक्ती कमी होत जाते. तिळाचे रोज सेवन केल्यास तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 


तीळामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारख्या तत्वामुळे हाडे मजबूत होतात. दिवसांत एक चमचा तीळ खाल्ल्यास दात मजबूत होतात. 


तिळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट असल्याने प्रतिकारक्षमता वाढते. तसेच यात कॅन्सरविरोधी तत्वही असल्य़ाने तीळ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही वाढू देत नाही.