मुंबई : तुम्हाला जर हेल्दी आयुष्य जगायचं असेल तर काही पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश असणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योग्य पदार्थ तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात. इतकंच नाही तर तुम्हाला तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवायची असेल तर हे पदार्थ तुम्हाला उपयोगी ठरतात. 


ब्रोकोली 


फ्लॉवरप्रमाणे दिसणारी हिरवी ब्रोकोली तुमच्या मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उत्तम असतं. यामध्ये असणारं कोलीन तुमच्या मेंदूचे सेल्स वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुमची बुद्धी तल्लख राहते. 


सुका मेवा


सुका मेवा म्हणजेच काजू, बदाम, मनुका, खारीक अशा पदार्थांचा तुमच्या दररोजच्या खाण्यात समावेश असावा. यातील विटॅमिन ई तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करतं. 


अंडी


अंडी तुमच्या शरीरासाठी पोषक असतात हे तुम्हाला माहीत आहे पण हेच अंडे तुमच्या मेंदूसाठी आवश्यक ठरतात. उल्लेखनीय म्हणजे, शॉर्ट टर्म मेमरीसाठीही तुम्हाला अंडी मदत करतात. 


मासे


तुमच्या मानसिक आरोग्यासाठी मासे केव्हाही फायदेशीर ठरतात. माशांतील फॅटस् शरीराला ओमेगा ३ फॅटी अॅसिड पुरवतात.... आणि हे फॅटस् मेंदूसाठी फायदेशीर असतात. 


बेरीज


स्ट्रॉबेरी, ब्लॅक बेरी आणि ब्लू बेरी यामध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात. ते तुमच्या मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरतात.