मुंबई : सकाळची वेळ ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची असते. सकाळी लवकर उठले पाहिजे याबरोबरच सकाळी तुम्ही कोणता आहार घेता हे देखील महत्त्वाचं आहे. सकाळच्या वेळेस आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे तुम्हाला सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवसाची सुरवात हेल्दी होणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील उपाय करुन पाहा. 


1. कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत होते. तसेच वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.


2. सकाळी किमान एक खजूर रिकाम्यापोटी खाल्याने अ‍ॅनिमियाचा त्रास कमी होतो. खजूरमधील आयर्न घटक हिमोग्लोबीन नियंत्रणात आणतात.


3.लसणाच्या तीन पाकळ्या चघळून त्यावर कपभर लिंबूपाणी प्यायल्याने लठठपणा कमी होण्यास मदत होते.  हा प्रयोग रिकाम्यापोटी केल्याने शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधरते. 


4.ग्लासभर पाण्यात जिरे मिसळून पाणी प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारण्यास तसेच रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यातील पोटॅशियम घटक आरोग्य निरोगी ठेवते.


5.कढीपत्त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. इन्सुलिनच्या निर्मितीचेही कार्य सुधारते. सकाळच्या नाश्त्यामध्ये कढीपत्ता खाणे आरोग्यास फायद्याचे आहे.