उपवास करत असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा
प्रत्येकाच्या जीवनात श्रध्दा भक्तीभावना असते ती आपण देवाची पूजा करुन किंवा उपवास करुन व्यक्त करत असतो.
मुंबई: प्रत्येकाच्या जीवनात श्रध्दा भक्तीभावना असते ती आपण देवाची पूजा करुन किंवा उपवास करुन व्यक्त करत असतो.
उपवास करताना आहारावर लक्ष देणं तितकचं महत्त्वाचं आहे. तुम्ही उपवास केल्यावर आरोग्य उत्तम राहण्यासाठी काही खास गोष्टी करा.
उपवासात या 5 गोष्टीं लक्षात ठेवा
1. उपवासादरम्यान आपण उपाशी जास्त वेळ असतो त्यामुळे संध्याकाळी एकदम पोटभरुन जेवन केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी एकदम न जेवता दिवसभर थोडं थोडं फराळाचं खात राहा.
2. उपवासांच्या दिवसात सकाळी ताज्या फळांचा रस किंवा एक ग्लास दूध पियाल्याने शरीरातील ऊर्जा कमी होणार नाही.
3. ताजे बटाट्याचे चिप्स, फळ, उपवासाचे पदार्थ असा आहार उपवासांच्या दिवसात घ्यावा.
4. उपवसाच्या दिवशी साधे पाणी, लींबूपाणी आणि नारळाचे पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा आणि चेहऱ्यावर तेज कायम राहते.
5. संध्याकाळी उपवास सोडत असाल तर लगेच तेलकट पदार्थ खाऊ नका, त्याशिवाय उपवास सोडत असताना सुरूवातीला टोमॅटोचे सूप घेवून मगच जेवण करा.