‘बीपी लो’ झाल्यास घरगुती उपचार
बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.
मुंबई : बीपी कमी होणं ही हायपरटेंशन इतकीच गंभीर समस्या ठरू शकते त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी होण्याची समस्या आज अनेकांमध्ये दिसते. या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. रक्तदाब कमी झाल्यास मरगळ येणे, निस्तेज वाढणे, मळमळणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणं आढळतात.
रक्तदाब कमी झाल्यानंतर या गोष्टी करा :
१. पाठीवर झोपा :
बीपी लो झाला की अचानक डोळ्यांसमोर अंधारी येणे, गरगरल्या सारखे वाटतं. त्यानंतर ताबडतोब पाठीवर झोपा. काहीवेळ डोळे बंद करून शांत पडून रहा.
२. ओरल रिहायड्रेशन सॉल्ट :
ओआरएस शरीराला पुन्हा रिहायड्रेट करायला मदत करतात. तसेच मीठ आणि इलेक्ट्रोलाईट्सचा पुरवठा करतात. बाजारात मिळणारी ओआरएसची पाकीट जवळ ठेवा आणि त्याचे मिश्रण बनवून प्या. मधूमेह म्हणजेच डायबिटीस असल्यासं ओआरएस पावडर पाण्यात मिसळून पिणे टाळा. यामध्ये साखरे देखील असते.
३. पाणी प्या :
ओआरएस नसल्यास पाणी प्या. पाण्यामध्ये थोडं मीठ आणि चमचाभर साखर मिसळा. मिठातील सोडीयम रक्तदाब नियंत्रित करतो तर साखर ग्लुकोज वाढवायला मदत करते.
४. मीठ चाखा :
रक्तदाब कमी झाल्यास मीठ चाखणे किंवा खारी बिस्किटं खाणं हा देखील उपाय करु शकतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. यासोबत तुम्ही साखर-मीठाचे पाणी पिऊ शकतात. पण हे अती प्रमाणात घेऊ नका. यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
५. डॉक्टरांचा सल्ला :
रक्तदाब स्थिरावल्यानंतर सामान्य झालात की डॉक्टांचा सल्ला घ्या. रक्तदाब कमी का झाला याचे निदान होणे गरजेचे आहे. रक्तदाबाकडे दुर्लक्ष करू नका याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्यास नियमित तपासून घ्या.