मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात थंड, गोड ठरबूज खाणे कोणाला खाणं आवडत नाही. पण हे नुसतं स्वाद चांगला आहे म्हणून तुम्ही खात असाल पण याचे अनेक फायदे देखील आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टरबूज खाण्याचे ५ फायदे


१. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे शरीराला पाण्याची आवश्यकता असते. टरबूजमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं. ज्यामुळे पाण्याची कमतरता कमी होते.


२. वजन कमी करण्यासाठी टरबूजचं रोज सेवन करावं. टरबूज खाल्याने पोट ही भरतं आणि फॅट्सही तयार होत नाही. 


३. टरबूजमध्ये विटामिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात असतं. टरबूजमध्ये शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. याचा मोठा फायदा डोळ्यांना देखील होतो. 


४. टरबूजमुळे तुमची त्वचा अधिक चांगली राहते. यामुळे त्वचेची सुंदरता वाढते. टरबुजाचे तुकडे त्वचेला लावल्याने त्वचा सुंदर होते.


५. टरबूजमध्ये लाइकोपीन असतं जे कँसरच्या कोशि‍कांचा नाश करण्यासाठी मदत करतं. टरबूजसोबत काळं मीठ आणि काळी मिरी खाल्याने अपचनाती समस्या दूर होते आणि पचन क्रिया चांगली राहते.