५ मिनिटांत दूर होतील ब्लॅकहेड्स
चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.
मुंबई : चेहरा गोरा असे वा सावळां प्रत्येकाला सतावणारी चेहऱ्याची समस्या म्हणजे ब्लॅकहेड्स. यामुळेच चेहऱ्यावर निस्तेजपणा वाढतो तसेच चेहऱ्यावरील छिद्रे मोठी झाल्याने पिंपल्सची समस्या उद्भवू शकते. तुम्हालाही ब्लॅकहेड्सची समस्या असेल तर हे आहेत त्यासाठी ५ घरगुती आणि फायदेशीर उपाय.
तांदळाचे पीठ,ग्रीन टी आणि दूध - एका वाटीत तांदळाचे पीठ आणि ग्रीन टी बॅग टाकून चांगले मिक्स करा. त्यात दोन चमचे दूध टाकून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. हे मिश्रण स्क्रबप्रमाणे ५ मिनिटे चेहऱ्यावर चोळा. पाण्याने चेहरा धुतल्यानंतर हायड्रेटिंग क्रीमचा वापर करा.
साखर, लिंबू आणि मध - एक चमचा ब्राऊन अथवा व्हाईट शुगरमध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा. चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिटे चोळा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील तसेच ब्लॅकहेड्स निघून जातील.
मध, बदाम आणि लिंबू - एका वाटीत एका बदामाची पूड, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिसळा. स्क्रबप्रमाणे चेहऱ्यावर लावा. ब्लॅकहेड्स दूर होण्यास या स्क्रबचा फायदा होतो.
ओटमील, दही, हळद आणि मध - एक चमचा ओटमील, एक चमचा दही, चिमूटभर हळद आणि एक चमचा मध एकत्रित मिसळा. चेहऱ्यावर हा स्रब लावून पाण्याने चेहरा धुवा.
सैंधव, लिंबाचा रस आणि मध - एक चमचा सैंधव, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करा. चेहऱ्यावर पाच ते सहा मिनिटे चोळा. त्यानंतर चेहरा धुवा.