मुंबई : उन्हाळा सुरु होताच अनेकांना घामोळ्याचा त्रास सतावतो. यासाठी बाजारात अनेक पावडरही उपलब्ध असतात. मात्र त्याने तात्पुरता फरक पडतो. उन्हाळ्यात सतावणाऱ्या घामोळ्याच्या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपाय करु शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडुनिंबामध्ये त्वचेसाठी लाभदायक असे अनेक गुण असतात. उन्हाळ्यात घामोळ्याचा त्रास सतावल्यास कडुनिंबाचा पाला पाण्यात उकळवून त्या पाण्याने आंघोळ करा.


उन्हाळ्यात शरीरात सतत पाण्याची कमतरता जाणवते. यामुळे सतत द्रव्य पदार्थांचे सेवन करा. फळांच्या रसाचे सेवन करा.


मुलतानी मातीचा लेप लावल्याने घामोळ्यांपासून आराम मिळतो. त्वचेची जळजळ कमी होते.


कोरफडीचा गरही घामोळ्यांवर लावल्यास समस्या दूर होते. 


उन्हाळ्यात त्वचेची जळजळ होत असल्यात त्या ठिकाणी चंदनाचा लेप लावावा. चंदनामुळे थंडावा मिळतो.