मुंबई : उन्हाळा म्हणजे द्राक्षांचा हंगाम... या दिवसांत मोठ्या प्रमाणात द्राक्ष बाजारात उपलब्ध असतात. तसेच इतर फळांपेक्षा द्राक्ष स्वस्त दरात मिळतात. हे द्राक्ष आरोग्यास खूप फायदेशीर असतात. प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, सोडियम, फाइबर, विटामिन ए, सी, ई, कॅल्शियम, लोह इत्यादी अनेक पोषक घटक द्राक्षामधून शरीरास मिळतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्राक्ष खाल्याने पोटाचे आजार कमी होतात. बद्धकोष्टतेवर द्राक्ष हा रामबाण उपाय आहे. उलटी होत असल्यास द्राक्षावर काळी  मिरी आणि मीठ टाकून खाल्यास उलटी थांबते.


मायग्रेनच्या त्रासालाही द्राक्ष अतिशय उत्तम औषध आहे. डोकं दुखत असेल तर द्राक्षांचा रस प्यावा, त्याने लगेचच आराम वाटतो. द्राक्षामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याने रक्तवाढीसही त्याची मदत होते. त्याचप्रमाणे अंगदुखी, सांधे दुखीवरही द्राक्ष औषधी आहे.