मुंबई : हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिरव्या पातीच्या कांद्यामध्ये कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅगनीज आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. हिरव्या पातीच्या कांद्याच्या सेवनाने हृद्याचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. 


हिरव्या पातीच्या कांद्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच व्हिटामिन सीचे प्रमाणही अधिक असते. यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास हिरव्या पातीचा कांदा फायदेशीर ठरतो.