मुंबई : पदार्थाचा गंध वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. तसेच मुखवासमध्ये वेलचीचा समावेश असतो. वेलचीमध्ये व्हिटामिन ए, बी, सीच्या व्यतिरिक्त मँगनीज आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की वेलचीमध्ये अनेक ब्युटी फायदेही असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगल्या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये त्वचा आणि केसांसाठी बनवण्यात येणाऱ्या लोशनपासून ते फेशियल ऑईल्ससारख्या अनेक प्रॉडक्टमध्ये वेलचीचे तेल वापरले जाते.


वेलचीच्या इसेंशियल आईलचा वापर तुम्ही दररोज क्लिंझरसारखा करु शकता. त्वचेवरील छिद्रे साफ होतात तसेच चेहऱ्यावरील डागही कमी करण्याचे काम हे तेल करते. यासाठी तेलाचे काही थेंब चेहऱ्याला लावून 2 मिनिटे मसाज करे. 


वेलचीचा मास्क चेहऱ्यावरील पिंपल्स तसेच डाग दूर करण्यास फायदेशीर ठरतो. वेलची पावडरमध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा. ज्या ठिकाणी पिंपल्स आण पिंपल्सचे डाग आहेत त्या ठिकाणी ही पेस्ट लावा. 10 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. 


वेलचीचे तेल इन्फेक्शन घालवण्यासही उपयोगी आहे. स्काल्पवर झालेले इन्फेक्शन दूर करण्यासाठी तसेच केसातील कोंडा घालवण्यासाठी वेलचीचे तेल केसांच्या मुळाशी लावा. यामुळे केस मजबूत तसेच चमकदार होतात.