मुंबई : तुम्हालाही चॉकलेट खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज डार्क चॉकलेटचा एक तुकडा खाल्ल्यास डायबिटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.


 


या संशोधनादरम्यान १८ ते ६९ या वयोगटातील एक हजार १५३ लोकांचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणादरम्यान ज्यांनी नियमित १०० ग्रॅम चॉकलेट खाल्ले त्यांच्यात डायबिटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी आढळून आला.


कोकोपासून बनवण्यात आलेली उत्पादने कार्डिओ मेटाबॉलिकचे स्वास्थ सुधारण्यास मदत करतात असेही या संशोधनादरम्यान आढळून आलेय.