मुंबई : तुम्ही तुमच्या घरी तांदूळ शिजवण्यासाठी नक्कीच प्रेशन कुकर किंवा इलेक्ट्रिक कुकरचा वापर करत असाल... परंतु, तुमच्या आजीच्या काळात मात्र मोठ्या टोपात तांदूळ शिजवले जात असत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेच तांदूळ शिजवलेलं पाणी आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतं, हे तुम्हाला माहीत आहे का? तांदळात असलेली सगळी पोषक तत्व यामध्ये मिसळलेले असतात. हे पाणी प्यायल्यानं तुम्हाला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. 


भाताचं पाणी प्यायल्याचे फायदे...


1. भाताच्या पाण्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे तुमच्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. 


2. भातामध्ये ओरिजेनॉल नावाचं तत्व आढळतं. हे तत्व त्वचेला सूर्याच्या यूव्ही किरणांपासून वाचवण्यासाठी मदत करतं. 


3. अतिसाराचा (डायरिया) त्रास जाणवत असेल तर भाताचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.


4. गर्मीच्या दिवसांत घामाच्या माध्यमातून आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडून 'डिहायड्रेशन' होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत भाताचं पाणी तुम्हाला 'डिहायड्रेशन'पासून वाचवतं. 


5. भाताच्या पाण्यात हिलिंगचे गुणधर्म असतात. त्यामुळे, छोट्या - मोठ्या संक्रमणापासून (इन्फेक्शन) तुम्ही दूर राहता.