मुंबई : साधारणपणे आपल्या रोजच्या जेवणात थोडेफार अन्न शिल्लक राहितेच. रात्रीच्या वेळेस एखाददोन पोळ्या जास्तीच्या राहतात. यावेळी आपण अनेकदा त्या फेकून देतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हे वाचल्यानंतर तुम्ही शिळी पोळी अजिबात फेकून देणार नाही. शिळी पोळी खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे


ज्यांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास अशा व्यक्तींनी गव्हाच्या दोन शिळ्या पोळ्या दुधात मिसळून खाल्ल्यास ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. 


घरातून निघताना दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्यास गॅसचा त्रास होत नाही. तसेच साखर नियंत्रणात राहते.


पोटासंबंधित समस्या असणाऱ्यांना दुधासोबत शिळी पोळी खाल्ल्यास या समस्या दूर होतात.