वोडकाचे आरोग्यवर्धक फायदे
वोडका म्हटले की साहजिकच दारुचा एक प्रकार असा विचार आपल्या मनात येतो. रशियात मोठ्या प्रमाणात वोडका प्यायला जात असे. मात्र आता जगभरात वोडका प्यायला जातो.
मुंबई : वोडका म्हटले की साहजिकच दारुचा एक प्रकार असा विचार आपल्या मनात येतो. रशियात मोठ्या प्रमाणात वोडका प्यायला जात असे. मात्र आता जगभरात वोडका प्यायला जातो.
वोडका प्यायल्याने नशा चढते हे जितके खरे तितकेच वोडक्याचे काही आरोग्यवर्धक फायदेही आहेत. वोडकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियमसारखी तत्वे असतात. तसेच यात कॅलरीजही असतात.
1. ताप आणि डोकेदुखीचा त्रास सतावत असल्यास वोडकाने आराम मिळतो. डोकेदुखीचा त्रास होत असल्यास वोडका पाण्यात टाकून त्यात टॉवेल भिजवून तो पिळून डोक्यावर ठेवा. यामुळे डोकेदुखी दूर होते.
2. दातदुखीचा त्रास होत असल्यास वोडकाचे काही थेंब दुखत असलेल्या जागी लावल्याने दातदुखी दूर होते.
3. त्वचा लालसर झाल्यास अथवा एखादा कीटक चावल्याने त्वचा लाल झाल्यास त्यावर वोडका लावावा.
4. वोडक्याचे काही थेंब शाम्पूमध्ये मिक्स करुन ते केसांना लावा. यामुळे फायदा होतो.
5. कान दुखत असल्यास वोडकाचे काही थेंब टाकून 5 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर कान साफ करा. यामुळे कानदुखी थांबेल.
6. त्वचा उजळवण्यासाठीही वोडकाचा वापर होतो. कॉटनवर काही थेंब वोडकाचे घेऊन ते त्वचेवर लावा.