खजूर खाण्याचे हे आहेत ५ फायदे
चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी गोड फळेही तितकीच महत्वाची आहेत. सुका मेव्यातील खजूर हे खूप चांगले. थंडीत खजूर तसेच खारीक खल्ल्याने त्याचे खूप फायदे आहेत. आज आपण खजूरबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.
खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
चांगल्या आरोग्यासाठी आणि सदृड शरीरासाठी खारीक अत्यंत उपयुक्त आहे. हिवाळ्यात खारकेचे सेवन खूप पौष्टिक मानले जाते. जर तुमची पचनशक्ती चांगली असेल तर खारीक जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरते.
थंडीमध्ये खारीक खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतात. विशिष्ट जातीचा खजूर वाळवून खारीक तयार केली जाते. खारीक नियमित खाल्ल्यास दमा असणाऱ्या रुग्णांना आराम मिळेल. अर्धांगवायू आणि हृदयविकाराचा त्रास खारकाच्या सेवनाने कमी होतो.
1. हाडांच्या आरोग्य सुधारणा :
खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते. तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते.
2. त्वचा उजळते :
खजूर खल्ल्याने त्वचा चांगली राहते. खारीकमध्ये व्हिटॅमिन सी, डी असतात. शिवाय, आपल्या आहार खारका असतील तर कोणत्याही त्वचाची समस्या जाणवत नाही. अकाली वृ्द्धत्व कमी होते.
3. पचन प्रकिया चांगली राहते :
रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खल्यास ते आरोग्यासाठी चांगले. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घ्या. थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बारीक करून घ्या. हे दुध खूप पौष्टिक असते, यामुळे भूक वाढते आणि अन्न व्यवस्थित पचते.
सर्दीने त्रस्त असाल तर खारीक उकळलेल्या दुधामध्ये विलायची पूड टाकून सेवन करा. सर्दी लवकर बरी होईल. खारीक नियमित खाल्ल्यास हृदयविकार होत नाहीत. शरीरातील रक्ताची कमतरता खारकाच्या सेवनाने दूर होईल.
4. मज्जासंस्था मजबूत :
खजूर तसेच खारका आपल्या मज्जासंस्था मजबूत ठेवण्यात मदत करतात. जीवनसत्त्वांमुळे मानवी मज्जासंस्थाचे आरोग्य आणि कार्यक्षमता वाढते. पोटॅशियममुळे मेंदूची गती व दक्षता वाढवण्यासाठी मदत होते. खजूर खल्ल्याने हृदय आणि रक्तदाब पातळी नियंत्रित राहते.
5. निरोगी गर्भधारणासाठी :
खजूर तसेच खारीकमध्ये खनिज, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे त्याचा लाभ गर्भाला होतो. गर्भाशयातील अर्भकाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. बाळाच्या जन्मानंतर रक्तस्त्रावाला प्रतिबंध होण्यास मदत होते. गरोदरपणी खजूर खल्ल्यास आईला चांगले दूध सुटते. त्यामुळे बाळाला पुरेसे पोषण मिळण्यास मदत होते.