मुंबई : आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात उच्च रक्तदाब हा एक समस्या बनली आहे. आपले खाणे आणि आपली जीवनशैली याला कारणीभूत आहे. दररोजचे स्टेन्शन यामुळे रक्तदाब वाढतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे. आहार योग्य घेतला पाहिजे. उच्च रक्तदाबर नियंत्रणात राहण्यासाठी संतुलित आहार घेतला पाहिजे. आहारात खालील पदार्थ घेतले तर रक्तदाबावर आपण सहज नियंत्रण मिळवू शकतो.


१. लिंबू -



लिंबामध्ये व्हिटॅमिन सी उच्च प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाबाला नियंत्रित होण्यास मदत होते.


२. लसून -



लसून उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यास मदत करते. कच्ची आणि शिजवलेली लसून खाणे चांगले. नायट्रिक ऑक्साइड आणि हायड्रोजन सल्पाइडमुळे रक्त वाहिन्यांना आराम मिळतो.


३. केळे -



केळ्यात पोटॅशिअमचा मोठा स्त्रोत असतो. तसेच सोडिअमही जास्त असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.


४. पालक -



पालक ही हिरवी पालेभाजी आहे. यात पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असते. फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे हृदय निरोगी राहते तसेच रक्तदाब नियंत्रणात राहतो.


५. कॉफिच्या बिया (बिन्स)



या बिन्समध्ये फायबर, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. हृदयाचा रक्तपुरवठा व्यवस्थित राहण्यास मदत होते.