मुंबई : सध्या अनेकजण चटपटीत खाण्याला प्राधान्य देतात. तसेच वडा पाव, भज्जी, फ्रेंच फ्राईज, समोसा, कटलेट आदी पदार्थात जास्त तेल असते. त्यामुळे गाडीवर किंवा घरात न्यूज पेपरचा वापर तेल टिपून घेण्यासाठी केला जातो. मात्र, हा न्यूज पेपर तुमच्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो, हे तुम्हाला माहित आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूज पेपर म्हणजे वर्तमानपत्र, वृत्तपत्र होय. याचा वापर तेलकट पदार्थातील तेल टिपून घेण्यासाठी गुंडाळले जातात. किंवा तेलकट पदार्थ त्यामध्ये ठेवले जातात. परंतु असे करणे तुमच्या जीवावर बेतू शकते. आरोग्याबाबत गंभीर आजारांना सामोरे जाऊ शकते. हे टाळण्यासाठी न्यूज पेपरचा वापर टाळणे केव्हाही चांगले.


आरोग्यासाठी हे आहेत धोके?


१. कर्करोग (कॅन्सर) :
वृत्तपत्रातील बातम्या छापण्यासाठी जी शाई वापरली जाते ती आरोग्याला अत्यंत घातक आहे. वडा, भज्जी, फ्रेंच फ्राईज, समोसा, कटलेट आदी पदार्थ गुंडाळून ठेवल्याने पेपरमधील शाई त्या पदार्थात उतरते. त्यामुळे ही शाई कॅन्सरला आमंत्रण देते. त्यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते.


२. फुफ्फुस आणि मूत्रपिंडावर प्रभाव पडतो
वृत्तपत्राची शाई खूप आरोग्याला घातक आहे. फुफ्फुस आणि मूत्रपिंडावर परिणाम करु शकते. किंवा शरीरातून विसर्जन होणाऱ्या घटकाच्या माध्यमातून पेपरची शाई वाईट परिणाम करते. त्यामुळे मूत्रपिंड निकामी होवू शकते. न्यूज पेपरमध्ये ठेवलेले फूड काळी शाई शोसून घेते. त्यामुळे हे अन्न पदार्थ खल्ले तर त्याचा फुफ्फुसावर परिणाम होतो.


३. पचन क्रियेवर होतो परिणाम
तेलटक फूड पेपरच्या कागदामध्ये गुंडाळून ठेवल्यामुळे शाई खाण्याच्या पदार्थात उतरते. असे शाई लागलेले पदार्थ पोटात गेले तर त्याचा परिणाम हा पचन क्रियेवर होतो. पचन क्रिया बिघाडली की, रोगांना निमंत्रण मिळते. पचन क्रिया बिघडल्याने हार्मोन्स वाढण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या फॅट्स वाढतात.