मुंबई : तस पोटातील हवा (गॅस) सोडणे हे खूप कॉमन आहे. पण हीच जेव्हा दहा लोकांसमोर सोडण्याची वेळ येते, तेव्हा मात्र प्रत्येकालाच त्याची लाज वाटते. मात्र एका संशोधनामधून हे समोर आलेय की, यात लाज वाटण्यासारखे काही नाही. उलट ते तुमच्या पचन संस्थेकरिता उत्तम आहे. पोटात जेव्हा गॅस तयार होतो तेव्हा हवा सोडावी लागते. मात्र ही हवा सोडताना नेहमीच आवाज येत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साधारणत: एक माणूस दिवसाला १४ वेळा शरिरातून हवा सोडतो. बहुतेक वेळा ही हवा आवाज न करताच बाहेर पडते आणि त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड गॅस निघण्याचे प्रमाण जास्त असते. जेव्हा हवा सोडल्यानंतर वास येतो म्हणजेच तुमच्या शरीरात फायबरसोबतच बॅक्टेरियाचे प्रमाणही योग्य आहे. जेव्हा सहनही होत नाही असा वास येतो म्हणजे तुम्ही असा आहार घेताय, ज्यामुळे तुमच्या शरीरात हायड्रोजन सल्फाईड जास्त प्रमाणात तयार होते. याचाच अर्थ असादेखील होतो की, तुम्ही जास्त फायबर डाएट घेता. गॅसचा वास तेव्हा चिंताजनक असतो, जेव्हा तुम्ही डेअरी (दुधाचे) पदार्थ जास्त खाता.


'हायर पर्सपेक्टिव'च्या वृत्तानुसार वास हा मुख्यत: शरीरात असलेल्या हायड्रोजन सल्फाईडमुळे येतो. आपण बऱ्याचदा असे खाणे खातो ज्याचे पचन झाल्यावर हायड्रोजन सल्फाईड गॅस शरीरात बनतो. हा गॅस शरीरातून बाहेर पडताना जास्त घाण वास येतो. जेव्हा हवा सोडल्यावर घाण वास येतो त्याचाच अर्थ की तुमचे पोट एकदम व्यवस्थित आहे.


अभ्यासातून हे देखील समोर आलेय की, जे वास घेतात त्यांच्यापण फायदा होतो. मिथेनच्या वासाने आजार होण्याचा धोका वाचतो आणि लोक दीर्घआयुष्य जगतात. या वासाने डिमेंशियाही बरा होतो.