मुंबई : आज माणूस कामात इतका व्यस्त झाला आहे की त्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला देखील वेळ नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात केसांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. आजच्या बदलत्या वातावरणामुळे आणि प्रदुषणामुळे केस गळणे, लवकर पांढरे होणे यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही घरगुती उपाय करुन तुम्ही केसा संबंधित समस्यांपासून दूर राहू शकता.


१. दुधी आणि तेल : दुधीचा रस आणि तेल एकत्र करून ते केसांना लावावे. तिळाचं तेलामध्ये किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये दुधीचा रस एकत्र करून लावणे हे केस गळण्यावर लाभदायक उपाय आहे. 


२. तेल मालिश : अंघोळीआधी खोबरेल तेलने मालिश केले जाते पण तेल गरम करून त्यामध्ये लिंबुचा रस आणि कडी पत्ता टाकून त्याने डोक्याची मालिश करा. केस गळण्याच्या समस्येवर हा लाभदायक आहे. 


३. बदाम आणि आवळा : जर तुमचे केस खूप दाट आहेत पण ती पांढरी होत असतील तर आवळा आणि बदाम यांचं तेल एकत्र करून लावल्यास फायदा होतो. हे दोन्ही तेल केसांसाठी फायदेशीर आहे.


४.  राई किंवा मोहरीचं तेल : २५० ग्रॅम राईच्या तेलात ६० ग्रॅम हिना घालून त्याला गरम करुन ठेवा. यानंतर या तेलाचा नियमित वापर करा. 


५. कांद्याची पेस्ट :  अंघोळी आधी १० मिनिटं केसांच्या मुळाशी कांद्याची पेस्ट लावून ठेवा. केस गळण्यावर हा लाभदायक ठरतो.