मुंबई : दातांची योग्य काळजी न घेतल्यास दाढ दुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे दाढ दुखीवर काय उपचार केले पाहिजे हे जाणून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दातांची निगा कशी राखावी


१. खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी व्यवस्थित चूळ भरावी.


२.सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.


३.खूपच थंड, गरम, कडक पदार्थांचे सेवन शक्‍यतो टाळावे.


४.लहान मुलांना खूप गोड व चॉकलेट, तसेच अतिथंड पदार्थ देणे टाळावे, तसेच नियमित दात घासायला लावणे.


दाढ दुखीवर सोपा उपाय :


तूळसीची ५ ते १० पाने स्वच्छ धुऊन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवून कुटुन त्याचा रस निर्माण करावा आणि त्यात कापुराच्या 3 ते 5 वड्या मिसळून घ्यावे. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्‍या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.


दाढ दुखीवर डॉक्टरांचा सल्ला देखील घ्यावा. दाढ नेमकी का दुखते यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.