मुंबई : चेहऱ्यावरील ब्लॅकहेडची समस्या सध्या कॉमन झालीये. याकडे वेळेत लक्ष दिले गेले नाही तर चेहऱ्यावर ब्लॅकहेड्सचे प्रमाण वाढत जाते. यामुळे पिंपल्स येण्याची शक्यताही वाढते. 


बाजारांमध्ये ब्लॅकहेड हटवण्यासाठी अनेक क्रीम्स आहेत मात्र बऱ्याचदा या क्रीम्स यावर उपायकारक ठरत नाही. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती पॅकचाही वापर करु शकता. 


असा बनवा पॅक


दालचिनी आणि मध ब्लॅकहेड हटवण्यासाठी गुणकारी आहे. दालचिनी पावडर आणि मध एकत्र मिक्स करा. चेहऱ्याच्या ज्या भागावर ब्लॅकहेड्स आहेत त्या भागावर हा पॅक लावा. या पेस्टवर कॉटन स्ट्रिप लावा. जेव्हा ही पेस्ट सुकेल तेव्हा हलक्या हाताने काढा. त्यानंतर चेहरा पाण्याने धुवा. दोन ते तीन वेळा हा उपाय केल्यास ब्लॅकहेड्स दूर होतील.