मुंबई : आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असते, त्याचा अधिक प्रभाव दिसत असला, तर त्यावेळी स्वच्छता करण्याची गरज आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या प्रकारे आपण आपले मळलेले कपडे धुवून टाकतो, आणि त्यानंतर एक उत्साहपूर्ण वातावरण तयार होते, त्याप्रमाणे, आपल्या मनातील वाईट म्हणजेच नकारात्मक गोष्टी साफ कराव्या लागतात. यामुळे आपल्या रोजच्या जगण्याचा एक नवा उत्साह आणि अर्थ प्राप्त होतो.


तेव्हा तुमच्या घरातील आजूबाजूचं वातावरण स्वच्छ करण्याचीही गरज असते. जेव्हा तुम्ही दुखद क्षणातून जात असाल तेव्हा अशा गोष्टी करणे अत्यंत महत्वाचं मानलं जातं. घर एक अशी वस्तू आहे, ज्यात अनेक वेळा नकारात्मक उर्जा भरलेली असतात, यावर तुमचा विश्वास आहे का?


अशा नकारात्मक गोष्टी हटवण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक असते.
काही जुनाट वस्तू ज्या कधीपासून तुमच्या कामात नाहीत त्या काढून टाका, 
थोडक्यात घराची नीट स्वच्छता करा, कोपरा न कोपरा झाडून पुसून काढा.
तुमच्या मनाशी बोला की हे जे काही करतोय. ते नकारात्मक गोष्टी घालवण्यासाठी.
घराची स्वच्छता केल्यानंतर अगरबत्ती अथवा धूप, चंदन जाळून घरातील वातावरण उत्साही करा.
अगरबत्ती घरातील कानाकोपऱ्यातून फिरवा, वॉर्डरोब्स उघडून येणारा गंध घालवण्यासाठी सुगंधीत वस्तूंचा धूर पसरवा.
पवित्र मानलं जाणारं जल घरात शिंपडा, पूर्वकडील खिडकी उघडून घरात फ्रेश वारा येऊ द्या.