घरच्या घरी बनवा स्वादिष्ट जीरा-आलू
या नवरात्रीमध्ये बनवा चविष्ट जीरा-आलू. जाणून घ्या याची रेसिपी
मुंबई : या नवरात्रीमध्ये बनवा चविष्ट जीरा-आलू. जाणून घ्या याची रेसिपी
साहित्य - 4 ते 5 बटाटे उकडून, त्याचे तुकडे करुन घ्या, एक चमचे जीरे, चिरलेली कोथिंबीर, 2 मिरच्या, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा लिंबाचा रस, दोन चमचे तेल, चवीपुरते मीठ
बनवण्याची कृती - पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे टाका. जिरे तडतडल्यानंतर त्यात मिरची टाका. नंतर त्यात उकडलेल्या बटाटाच्या फोडी टाका.
या मिश्रणात अर्धा चमचा हळद, लाल मिरची पावडर आणि चवीपुरते मीठ टाका. सर्व मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. चवीपुरता लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी ढवळा आणि गरमागरम सर्व्ह करा. या भाजीसोबत तुम्ही पुरी अथवा चपातीही सर्व्ह करु शकता.