मुंबई : आता उन्हाळा आलाच आहे. महिलांप्रमाणेच त्याचा परिणाम पुरुषांच्या त्वचेवर आणि खास करुन चेहऱ्यावर होतोच. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेणे भाग आहे. खाली दिलेले काही उपाय घरच्या घरी केल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. हे उपाय स्वस्त आणि घरच्या घरी करता येण्यासारखे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलतानी माती
तुमचा चेहरा जर तेलकट असेल तर त्यासाठी मुलतानी माती चांगला उपाय आहे. मुलतानी मातीचे फेस पॅक आणून त्यात कोरफड, अंड्याचा बलक आणि मध घालून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि मग १० मिनिटांनी चेहरा धुवून टाकावा.


लिंबू फेस पॅक
लिंबाचे फेस पॅक तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल हटवण्यात मदत करते. हे तयार करण्यासाठी एक चमचा मध, एक चमचा लिंबाचा रस आणि थोडसं ऑलिव्ह ऑईल एकत्र करावे. त्यानंतर चेहरा धुवून चेहऱ्यावर आणि मानेवर हा पॅक लावावा. २० मिनिटांनंतर ते धुवून टाकावे.


दही
तुमच्या चेहऱ्यावर छिद्र असतील दह्यात थोडासा लिंबाचा रस टाकून ते चेहऱ्यावर लावावे. यामुळे तुमचा चेहराही एकदम साफ होतो. याशिवाय दह्यात संत्र्याचा एक छोटीशी फोड टाकावी, त्यात कोरफडीचा एक चमचा गर टाकावा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर १० मिनिटे लावावे.


बेसन आणि हळद
एक चमचा चण्याचे पीठ घेऊन ते दूध किंवा गुलाब पाण्यात टाकावे. त्यात दोन चिमूट हळद टाकून मिश्रण तयार करावे. चेहऱ्यावर हे मिश्रण १५ मिनिटांसाठी लावावे. यामुळे टॅन झालेली त्वचाही साफ होण्यास मदत होते.


केळे आणि गुलाब पाणी
चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये जमा झालेला मळ साफ होण्यास यामुळे मदत होऊ शकते. त्यासाठी केळ्याची पेस्ट तयार करुन त्यात गुलाब पाणी टाकावे हवे असल्यास त्यात ऑलिव्ह ऑईल टाकण्याचाही पर्याय आहे. चेहऱ्यावर सुकेपर्यंत ते लावू ठेवावे. त्यानंतर चेहरा धुवावा.


ओटमील
बाजारात मिळणारे ओटमील मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर तयार करावी. त्यात थोडे उकळते पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. हे मिश्रण १०-१५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावावे