तुमचे डोळे लाल होत असतील तर...
मुंबई : डोळे लाल होण्याचे जास्त प्रमाण आपल्याला उन्हाळ्यात दिसून येते. तसेच संगणक, लॅपटॉप समोर सातत्याने काम करणे आणि टीव्हीसमोर बसणे हे सुद्धा डोळे लाल होण्याची कारणे आहेत.
यापासून सुटका होण्यासाठी...
१. डोळे किमान दिवसातून तीन-चार वेळा स्वच्छ पाण्याने धुणे.
२. रोज न विसरता उन्हात जाताना चांगल्या दर्जेचा गॉगल वापरा.
३. नेहमी डोळ्यांची अधुनमधून उघडझाप करा.
४. दररोज द्रव (उदा.पाणी) पदार्थ जास्तीत जास्त प्या.
५. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा.
६. तसेच कामाच्या ठिकाणी संगणक आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच ३ फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या.
७. आणि हे सर्व उपाय करूनदेखील डोळ्यांची लालसरपणा कमी न झाल्यास नेत्र तज्ज्ञांच्या सल्ला घ्या.
८. डॉक्टरांकडून डोळे ओलसर राहण्यास योग्य तो सल्ला घ्या आणि डोळ्यांची चांगली काळजी घ्या.