मुंबई : आज असं कोणालाच वाटत नाही की आपली उंची कमी असावी. सगळ्यांना त्यांची हाईट योग्यच असावी असं वाटतं. हाईट हे आपल्या पर्सन्यालिटीचा एक महत्त्वाचा भाग आहे. योग्य हाईट असेल तर तुमची एक वेगळं व्यक्तीमत्व तयार होतं. अनेक करिअर क्षेत्रातही योग्य हाईट असणं आवश्यक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१८ वर्षानंतर हाईट वाढतं नाही असं अनेक लोकांना वाटतं. पण ही चुकीची धारणा आहे. तुम्ही तुमची हाईट १८ वर्षापर्यंत ही वाढवू शकता. जर तुम्ही नियमित व्यायाम, पौष्टिक जेवन केलं तर तुमची हाईट वाढण्यात नक्की मदत होईल.


शरीरातील ह्युमन ग्रोथ हॉरमो हे हाईट वाढवण्यासाठी मदत करतात. प्रोटीन आणि न्युटीशन योग्य प्रमाणात न मिळाल्यास हाईट वाढण्याची गती थांबते. त्यामुळे चांगली बॉडी आणि हाईटसाठी योग्य आहार घेणं खूपच गरजेचं आहे. कोल्ड ड्रिंक्स हे सध्या मोठ्या प्रमाणात घेतलं जातं पण याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. बर्गर, नूडल्स, पिज्जा खाण्यामुळे हाईटवर याचा विपरित परिणाम होतो. दूध, दही, पनीर, दाळ खाल्याने यातून प्रोटीन्स मिळाल्याने हाइट वाढते. विटामिन, मिनरल्ससाठी फळे, जूस, हिरव्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे.


विटामिन ए सुद्धा यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. पालक, गाजर, दूध, टमाटर याच्या सेवनाने विटामिन ए मिळतं.