मुंबई : सर्दी खोकला झाला तर आपण पटकन जवळच्या केमिस्टकडे जातो आणि कोणतेतरी कफ सिरप घेऊन येतो. वैद्यकीय कंपन्यांनी केलेल्या जाहिरातींवर आंधळा विश्वास ठेवून आपण हे सर्व करतो. या कफ सिरपमुळे आपला त्रास खरंच किती कमी होतो हा वादाचा विषय असला तरी या कफ सिरपमुळे आपल्याला दिवसभर झोप येत राहते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हणून आता केमिस्टकडून कोणत्यातरी कंपनीचे कफ सिरप आणण्यापेक्षा घरच्या घरी एखादे कफनाशक औषध तयार करणे जास्त उपयोगी पडू शकते. त्यासाठी घरात असणारे आले सर्वात जास्त गुणकारी आहे.


असे तयार करा औषध
आल्याचे लहान तुकडे करुन घ्या. त्यानंतर एका लिंबाचे साल सोलून घ्या आणि या दोन्ही गोष्टी एक कप पाण्यात टाका. एक चमचा लिंबाची साल घेतल्यास पाव चमचा आल्याची पावडर घ्या. 


हे मिश्रण उकळवून घ्या. नंतर हे मिश्रण गाळून घ्या. यानंतर थोडे मध घेऊन ते थोडे गरम करा. यानंतर आल्याचे मिश्रण त्यात टाका. यानंतर त्यात लिंबू पिळा आणि ते थोडे उकळवा. उकळल्यानंतर एका काचेच्या बाटलीत ते काढून घ्या.


याशिवाय एक अन्य उपाय म्हणजे एक कप ग्लिसरीन घ्या. त्यात एक कप मध घाला आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण एका काचेच्या बाटलीत भरुन ठेवा. हे कफ सिरप काही महिन्यांपर्यंत टिकू शकते.