मुंबई : होळी आणि भांग यांचं जुनं नातं आहे. होळीला भांग पिऊन नाच गाणे करण्याची परंपरा बॉलिवूडने भारतीयांमध्ये रुजवली. पण, दुर्देवाने या भांगेचा आजकाल केवळ दारू इतकाच विचार केला जातो. कमी प्रमाणात भांग सेवन केल्यास त्याचे काही आरोग्यवर्धक फायदेही आहेत. आयुर्वेदातही भांग पिण्याचे फायदे सांगितले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. एका विशिष्ट प्रमाणात भांग प्यायल्याने मांसपेशींना झालेली दुखापत कमी होण्यास मदत होते. तसेच आर्थरायटिस आणि गुडघेदुखीचा त्रास ज्यांना आहे त्यांनाही भांग पिण्याचा फायदा होऊ शकतो. भांगेची एक गोळी खाल्ल्याने वेदना सहन करण्याची शक्ती वाढू शकते.


2. भांग थंड असते. त्यामुळे ताप आला असल्यास एका विशिष्ट प्रमाणात भांग प्यायल्याने ताप उतरण्यास मदत होते. तसेच शरीराचे उतरलेले तापमान कायम राखण्यातही मदत होते.


3. हिंग मिसळून भांग प्यायल्याने मानसिक संतुलन ठीक करता येते. ताण तणाव चिंता दूर ठेवण्यासाठी भांग वापरली जाते.  तसेच भूक वाढवण्यासाठी भांगेचा उपयोग काळ्या मिरीसोबत केला जातो.


4. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही डॉक्टरांच्या मदतीने भांग उपयोगात आणण्याची पद्धत आहे.


5. त्वचेसंबंधी काही विकार असल्यास भांग वापरुन ते दूर केले जाऊ शकतात.


6. मोठ्या प्रमाणावर डोकेदुखीचा त्रास होत असल्यास भांगेच्या पानांचा रस काढून त्याचे तीन-चार थेंब कानात घातल्यास दिलासा मिळू शकतो.


7. पण, भांग पिताना ती उपाशी पोटी पिऊ नये. तसेच गरोदर महिलांना भांग देऊ नये.  मधुमेह आणि हृदयाचे विकार असणाऱ्या व्यक्तींनीसुद्धा भांग पिऊ नये.


सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वैद्यकीय कारणांसाठी भांग उपयोगात आणताना आपल्या डॉक्टरचा किंवा वैद्याचा सल्ला घ्यावा. स्वतःच्याच मनाने कोणताही उपाय करू नये.