मुंबई : पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही... काळजी का करता... तुमच्या घरीच तुमच्या त्वचेला सुंदर बनवणारे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्वचेची सुंदरता आणि कोमलता कायम राखण्यासाठी आपल्या किचनमध्ये अनेक गोष्टी असतात ज्या नॅच्युरल मॉइश्चरायजरचं काम करतात.


मध


त्वचेचं क्लिंन्जिंग करण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे मध... मधाच्या वापरामुळे त्वचा कोमल बनते आणि उजळतेही. यामुळे, चेहरा, हाता-पायाची चमक कायम राहते.


ताक


ताक तुमच्या त्वचेतून डेड स्किन सेल्स बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यामुळे तुमची त्वचाही एव्हरयंग दिसते. एक सूती कपडा घेऊन तो थंड ताकात बुडवा आणि या कपड्यानं आपला चेहरा ५ ते १० मिनिटांपर्यंत झाकून ठेवा... त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्या.


ऑलिव्ह ऑईल


गेल्या अनेक वर्षांपासून ऑलिव्ह ऑईल मॉइश्चरायजर म्हणून वापरलं जातं. यामध्ये लेवेंडर एसेन्शियल ऑईलचे काही थेंब टाकून आंघोळीच्या पाण्यात वापरा... त्यामुळे तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते.


नारळाचे तेल


नारळाचं तेल खूप चांगलं मॉइश्चरायजर असतं. हे तेल प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी दाभदायक ठरतं. नारळाचं तेल वापरल्यानं अवेळी त्वचेवर सुरकुत्या दिसून येत नाही. २ चमचे नारळाचं तेल, एक चमचा मध आणि एक चमचा संत्र्याचा रस मिसळून त्वचेवर लावा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या.


काकडी 


काकडीमध्ये ९५ टक्के पाण्याचा अंश असतो, त्यामुळे काकडी त्वचेचं मॉइश्चरायजेशन चांगल्या पद्धतीनं करू शकते. काकडीचा रस चेहऱ्यावर आणि मानेवर ३० मिनिटांपर्यंत लावून ठेवा... त्यानंतर पाण्यानं चेहरा धुवून घ्या.


कोरफड


कोरफड हा सर्वोत्तम उपाय तुम्ही कधीही वापरू शकता. कारण, त्वचा तेलकट असो वा कोरडी त्यासाठी कोरफड उपयोगी ठरतं. यामध्ये असणारे बीटा-कॅरोटीन, विटॅमिन सी आणि ई त्वचेला स्वस्थ ठेवतात. यासाठी कोरफडीचा गर चेहऱ्याला लावून ठेवा... आणि काही वेळाने धुवून टाका... मग पाहा, तुमच्या चेहऱ्याची चमक...