अती कॅल्शियमने ह्रद्यविकाराचा जास्त धोका
रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचा थर जमा झाल्यास ह्रद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
न्यूयॉर्क : रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचा थर जमा झाल्यास ह्रद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. अमेरिकेतील इंटरमाउंटेन मेडिकल सेंटर हार्ट इंस्टीट्यूटने केलेल्या संशोधातून हा निषकर्ष काढण्यात आला आहे.
शरीरात कॅल्शियमचे प्रमाण कमी असेल तर अनेक आजार होऊ शकतात परंतु कॅल्शियमचे अधिक प्रमाणही मानवी शरीरास घातक ठरू शकते.
रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियमचा थर जमा झाल्याने रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे येतात आणि त्यामुळे एथ्रोस्क्लेरोसिस नावाचा आजार बळावू शकतो, असे इंटरमाउंटेन मेडिकल सेंटर हार्ट इंस्टीट्यूट संशोधन संस्थेतील संशोधक ब्रेंट मुलेस्टीन यांनी सांगितले.