मुंबई : अनेकदा तुमचे हास्य समोरच्या व्यक्तीचे दुख दूर करण्यास कारणीभूत ठरते. यात तुमच्या सुंदर हास्यासह तुमचे दातही मोत्यासारखे चमकदार असतील तर त्या हास्यात अधिकच सुंदरतेची भर पडते. यासाठी मार्केटमध्ये अशी अनेक उत्पादने आहेत जी काही दिवसांत मोत्यासारखे चमकदार दातांची जाहिरात करतात. मात्र अशा उत्पादनांचे साईडइफेक्टही होतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दात मोत्यांसारखे चमकवण्यासाठी संत्रे अतिशय फायदेशीर आहे. कारण यात व्हिटामीन सी आणि कॅल्शियम असते. ज्यामुळे दात चमकण्यात मदत होते. 


संत्रे शरीरासाठीच केवळ फायदेशीर नाही आहे तर सौंदर्यही बहरते. संत्र्याची साल कमीत कमी दोन मिनिटे दातांवर घासल्यानंतर दात चमकदार होण्यास मदत होते. तसेच संत्र्याची सालीची पावडर लावल्यासही फायदा होता. यात सायट्रिक अॅसिड असते ज्यामुळे दातांवरील एनॅमलचा थर दूर होऊन दातांवर चमक येते. 


यासाठी संत्र्याची साल आपल्या दातांवर योग्य प्रकारे घासा. त्यानंतर ब्रश करा. याचप्रमाणे संत्र्याच्या पावडरीचा वापर करु शकता.