मुंबई : उन्हाळ्यात जसे तुम्ही आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेता त्याचप्रमाणे डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. या उन्हाळ्यात पारा ५०अंशाच्या वर गेला आहे अशा परिस्थितीत त्वचेबरोबरच डोळ्यांची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे असते. उन्हाळ्यात धूळ, मातीमुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहीत आहे का सूर्यापासून येण्यारे अल्ट्राव्हायलेट किरणे डोळ्यांकरिता किती हानिकारक आहेत? या किरणांमुळे मेलानोमा किंवा लायमोफोमासारखे डोळ्यांचे आजार होऊ शकतात. ही अल्ट्राव्हायलेट किरणे प्रकाशाहून अधिक वेगाने येतात व फक्त उन्हातच नाही तर सावलीत देखील असतात ज्यामुळे डोळ्यांशी निगडीत आजार होण्याची शक्यता असते.

यावर उपाय म्हणून उन्हात फिरतांना सनग्लासेस जरूर लावा जे तुमच्या डोळ्यांचे अल्ट्राव्हायलेट किरणांपासून संरक्षण करेल. केवळ उन्हात फिरतांनाच नाही तर सावलीत देखील सनग्लासेस लावा.

एरव्ही फॅशनकरिता वापरल्या जाणाऱ्या हॅट्स देखील तुम्हाला या हानिकारक किरणांपासून सुरक्षित ठेवतात. उन्हाळ्यात शक्य होईल तितके जास्त पाणी पिणे ज्यामुळे शरिरातील पाण्याचे प्रमाण योग्य तेवढे राहते आणि यूव्ही किरणांच्या घातक परिणामांपासून आरोग्याचे संरक्षण करते.

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांत ल्युब्रिकेशनची कमतरता भासते ज्यामुळे जिरोफ्थलमिया (डोळे कोरडे) होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या, सनग्लासेस व हॅट जवळ ठेवा. तसेच डोळ्यांच्या समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.