शरीरातील या 7 भागांवर आलेली सूज दुर्लक्षित करू नका
शरीरातील कोणत्याही भागावर सूज आल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन, वेळेवर उपचार करणं गरजेचं आहे. या भागांवर आलेली सूज कधीच दुर्लक्षित करण्यासारखी नसते, कारण या सूजमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
मुंबई : शरीरातील कोणत्याही भागावर सूज आल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन, वेळेवर उपचार करणं गरजेचं आहे. या भागांवर आलेली सूज कधीच दुर्लक्षित करण्यासारखी नसते, कारण या सूजमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
हे आहेत ते 7 भाग आणि यांच्यावरील सुजचे परिणाम
1. पाय : पायावर येणाऱ्या सुजमुळे शरीरात प्रोटीनची कमतरता होते आणि पोटाच्या कॅन्सरची समस्या निर्माण होते.
2. पोट : पोटाच्या चारही बाजूला आलेली सुज पोटाच्या कॅन्सरचे आणि पोटाला टी.बी होण्याचे लक्षण असते.
3. डोळे : डोळ्यांवर आलेली सूज थायरोटाक्सिकोसिस आणि किडनीच्या आजाराचे संकेत देत असते.
4. हात : हातांवर येणाऱ्या सूजमुळे लिव्हर, किडनी आणि एडियोपॅथिक एडिमाचा त्रास होण्याची शक्यता असते.
5. नख : नखांच्या आजुबाजूला येणारी सूज फुप्फुसांच्या कॅन्सरचे लक्षण असते.
6. मान : मानेवर सूज येत असल्यास, पेस्कोस्ट्युमर हा आजार होण्याचा संकेत असतो.
7. जीभ : जीभेवर आलेल्या सूजमुळे एंजियोडिमा आणि थायरॅाईड होण्याची शक्यता असते.