कॅन्सरची ९ सामान्य लक्षणे
. कॅन्सरची प्राथमिक लक्षणे तितकीशी आढळत नाहीत. मात्र जेव्हा आढळतात तेव्हा त्या आजाराने दुसरी अथवा तिसरी स्टेज गाठलेली असते आणि तोपर्यत उपचाराची योग्य वेळ निघून गेलेली असते.
मुंबई: हल्लीची व्यस्त जीवनशैली, आहाराच्या अनियमित वेळा यामुळे आजारांचे प्रमाण वाढत चाललेय. काही आजार असे असतात ज्यांचे निदान पहिल्या स्टेजला होतेच असे नाही. कॅन्सर हा असाच आजार आहे. ज्याची प्राथमिक लक्षणे तितकीशी आढळत नाहीत. मात्र जेव्हा आढळतात तेव्हा त्या आजाराने दुसरी अथवा तिसरी स्टेज गाठलेली असते आणि तो पर्यत उपचाराची योग्य वेळ निघून गेलेली असते.
आता असं न करता कॅन्सरचे छोटी छोटी लक्षण तुम्ही घरातचं ओळखू शकता आणि या लक्षणांना दुर्लक्ष न करता वेळेवर डॉक्टरांकडून उपचार करा.
कॅन्सरच्या आजाराची लक्षणे:-
१. अचानक वजन कमी होणे.
२. तणाव निर्माण होणे.
३. शरीरातील कोणताही भाग चार आठवड्यापेक्षा जास्त दुखणे.
४. जास्त खोकला होणे.
५. आवाजात बदल होणे.
६. खूप घाम येणे.
७. सलग ताप येणे.
८. जेवण गिळताना त्रास होणे.
९. शरीरात गाठी तयार होणे.