मुंबई : नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार जे लोक जास्त मसालेजदार खातात त्यांच्यामध्ये हार्ट अॅटॅक अथवा स्ट्रोकचा धोका कमी असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्मोन्ट युनिव्हर्सिटीमधील लर्नर कॉलेज ऑफ मेडिसनने केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आलीये. लाल मिरची खाणाऱ्या लोकांमध्ये हार्ट अॅटॅक तसेच स्ट्रोकमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका १३ टक्के कमी होतो.


सुरुवातीच्या काळात मिरची तसेच दुसऱ्या मसल्यांचा वापर औषधांमध्ये केल जात असे. २०१५मध्ये चीनमध्ये करण्यात आलेल्या संशोधनातही मिरचीमुळे अनेक रोगांपासून बचाव होत असल्याचे समोर आले होते.