मुंबई : तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. मात्र हे शक्य आहे. यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन दिवसांत वजन कमी कऱण्यासाठी टिप्स


दररोज दहा ग्लास पाणी प्या.


फायबरयुक्त आहार जसे कच्ची फळे आणि भाज्या, ओट्स, धान्य यांचे सेवन करा.


लीन प्रोटीन अधिक मात्रामध्ये सेवन करा. 


अँटीऑक्सिंडंट ज्यूस आणि जांभूळाचा रस आदि प्या. 


तीन दिवसांसाठी लिक्विड डाएट


तीन दिवस तरल आहार आणि डिटॉक्स पेयाचे सेवन केल्यास तुम्ही एक किलो वजन कमी करु शकता. डिटॉक्स पेयाच्या रुपात तुम्ही गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून पिऊ शकता. नारळ पाणी, लिंबू सोडा ही पेय प्या. 


डाएटसोबत हेही करा


दररोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करा. 


चहा-कॉफीऐवजी ग्रीन टी अथवा वाईन टी घ्या. 


बैठे काम करत असाल तर एक तासाने पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन चाला. 


काय खाऊ नये


जंकफूट खाणे पूर्ण टाळा.


रिच फूड जसे चॉकलेट, केक, टॉफी, आईस्क्रीम, कँडी इत्यादी पदार्थ खाऊ नका. 


अतिरिक्त साखर असलेले तसेच तळलेले पदार्थ खाऊ नका. 


अल्कोहोल घेऊ नका. 


धूम्रपान करु नका.