१५ दिवसांत वजन घटवा
जेवणातील मसाल्याच्या पदार्थांमध्ये महत्त्वाचा घटक जिरे. जिऱ्यामुळे पदार्थाचा स्वाद वाढतो. फोडणीमध्येही जिरे वापरतात.
मुंबई : जेवणातील मसाल्याच्या पदार्थांमध्ये महत्त्वाचा घटक जिरे. जिऱ्यामुळे पदार्थाचा स्वाद वाढतो. फोडणीमध्येही जिरे वापरतात. अनेकजण भात शिजवतानाही जिऱ्याचा वापर करतात. मात्र हे जिरे केवळ स्वाद वाढवण्याचेच काम करत नाही तर शरीरासाठी लाभदायक आहे. वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाहीत. मात्र वजन वाढवण्यामध्येही जिरे खूप उपयुक्त ठरु शकते. १५ दिवस जिऱ्याच्या नियमित सेवनाने तुम्ही वजन कमी करु शकता.
१५ दिवसांत वजन कमी करण्यासाठी हा आहे उपाय
पहिला उपाय - दोन मोठे चमचे जिरे एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी उकळून प्या. तसेच उरलेले जिरेही चावून खा. याचे रोज सेवन केल्यास शरीरातील अनावश्यक चरबी कमी होईल.
दुसरा उपाय - रोज पाच ग्रॅम दहीमध्ये जिरे पावडर मिसळून खा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
तिसरा उपाय - ३ ग्रॅम जिरे पावडर पाण्यात मिसळा त्यात काही थेंब मध टाका. हे पाणी नियमितपणे सेवन केल्यास वजन घटवण्यात मदत होते.
चौथा उपाय - आले आणि लिंबू दोन्ही पदार्थ जिऱ्याची वजन कमी करण्याची क्षमता वाढवतात. यासाठी गाजर आणि उकडलेल्या भाज्यांमध्ये आलं किसून टाका. यात वरुन जिरे आणि लिंबूचा रस पिळा.
वर दिलेल्या उपायांपैकी दोन उपाय नियमित १५ दिवस केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.