मुंबई: पावसाच्या दिवसात केसांना दुर्गंधी येते. लांब सडक केस असले की या दिवसात केस सुकवणे कठीण जाते आणि केस आतून ओलेच राहतात, त्यामुळे केसांना दुर्गंधी येते. 
केसांतून येणारी दुर्गंधी ही आपल्यालाच असह्य होते, आणि आपले सुंदर केस चिकट दिसतात. सुंदर आणि मोकळे केसं ही प्रत्येकाची ओळख त्यासाठी हे उपाय करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसांची दुर्गंधी दूर करण्यासाठी ५ सोपे उपाय:


1. केस धुतांना केसात मॅाईश्चर वाढवणारा शॅम्पू वापरू नये, स्वच्छ पाणी आणि अ‍ॅन्टीफंगल किंवा अ‍ॅन्टीबॅक्टेरियल शॅम्पूचा वापर करावा. 


2. पाण्यामध्ये तुळशीचे पाने टाकून त्याने केस चोळून स्वच्छ धुवावेत. केस स्वच्छ धुतल्यानंतर कंडिशनर लावावं आणि कोरडे करुन घ्यावे.


3. पावसात केस भिजल्यानंतर घरी येऊन ताबडतोब केस सुकवावे. लांब केस असल्यास हेअर ड्रायरचा वापर करुन केस सुकवावे.


4. केसांची निगा राखण्यासाठी रोजच्या आहारात पालेभाज्याचा आणि फळं नियमित घ्यावेत.


5. रोजच्या जीवनशैलीतील धावपळ कमी करावी कारण घाम आला की डोक्याला खाज येते.