न्यूयॉर्क : अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक नवीन तंत्रज्ञान शोधून काढलंय, ज्याद्वारे अत्यंत धोकादायक असे कॅन्सर सेल्स केवळ दोन तासांत नष्ट करता येऊ शकतात. हे तंत्रज्ञान लहान मुलांसाठी तसंच अत्यंत कठिण अशा ट्युमरला निष्क्रिय करता येऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानामुळे कॅन्सरच्या ९५ टक्क्यांपर्यंत कोशिका निकामी करण्यात संशोधकांना यश मिळालंय. एखाद्या ट्युमरपर्यंत पोहचणं कठिण असेल अशा ट्युमरलाही यामुळे निकामी करता येऊ शकेल.


या तंत्रज्ञानात नायट्रोबेंडाडेहाइडे नावाचं रसायन ट्युमरच्या आत टाकलं जातं, त्यामुळे कोशिकांवरही परिणाम होतो. त्यानंतर या कोशिकांवर लख्ख प्रकाश टाकला जातो यामुळे कोशिका आतून आम्लीय बनतात आणि स्वत:लाच नष्ट करू लागतात. डोबिन यांच्या म्हणण्यानुसार, दोन तासांमध्ये ९५ टक्के कोशिका नष्ट होतात. 'द जर्नल ऑफ क्लिनिकल ओंकोलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आलाय.