मुंबई : म्हातारपणा आणि आपल्या आहाराचा मोठा संबंध असतो, काही पदार्थ आपल्याला लवकर म्हातारपण आणतात. खालील सात पदार्थ कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीठाचे प्रमाण पॅक पदार्थांमध्ये जास्त असतं. मीठातील सोडीयममुळे थकवा येतो, मीठाचे प्रमाण आहारात जास्त असणाऱ्यांच्या चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात.


तिखट पदार्थ
तिखट पदार्थ खाल्ल्याने रक्त वाहिन्या रिअॅक्ट होतात, त्यामुळे त्वचेचं रेडिनेशन वाढतं, म्हातारपणी येणारे डाग लवकर स्कीनवर दिसतात, म्हणून तिखट कमी खा.


साखर 
साखर खाल्ल्याने त्वचेला सुरकुत्या पडतात, कारण साखरेमुळे त्वचेतील कोलेजन डॅमेज होतो. जास्त साखरेमुळे दातही लवकर खराब होतात, खोड कमी खाणे हा त्यावर उपाय आहे.


कॉफी
कॉफी पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. याचा परिणाम सर्वात अगोदर स्किनवर होतो. ज्यामुळे स्किनची चमक दूर होते. वय जास्त दिसू लागते. कॉफीमुळे दातांवर डाग पडतात. ग्रीन टी सर्वात बेस्ट आहेत.
 
ट्रांसफॅट
बर्गर आणि इतर फास्ट फूड्समध्ये ट्रांसफॅट मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे फक्त हृदयाचे आजारच नाही, तर स्किन कोलेजनला नुकसान पोहोचते. यासोबतच सुर्याच्या यूव्ही रेजमुळे स्किनला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. कॉर्न चिप्स किंवा व्हेजी फिंगर्स चांगला ऑप्शन आहे.


कार्ब्स
कार्ब्स म्हणजे ड्राय फ्रुट्स, भाज्या आणि फळे हे आपले वय आणि हेल्थ कंडीशननुसारच खावेत. गरजेपेक्षा जास्त कार्ब्स खाल्ल्याने शरीर याला योग्य प्रकारे उपयोगात आणु शकत नाही. यामुळे उर्वरीत कार्ब्स शुगरमध्ये परावर्तित होतात. स्किनवर सुरकूत्या पडतात. 


अल्कोहोल
अल्कोहोलमुळे लिव्हरमध्ये टॉक्सिन्स जमा होतात. यामुळे पिंपल्स आणि सुकरुत्या पडतात.  लिव्हर हेल्दी असेल तर स्किन हेल्दी राहते. अल्कोहोलमुळे झोप खराब होते. ज्या व्यक्तीची झोप पुर्ण होत नाही, त्याच्या चेह-यावर म्हातारपणाचे लक्षण लवकर दिसू लागतात.