मासिक पाळी दरम्यान पोटदुखी दूर करण्यासाठी सोप्या टीप्स
मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते... खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकोसा ठरतो.
मुंबई : मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते... खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीवर नकोसा ठरतो.
खरं म्हणजे, हा त्रास चुकीचा व्यायाम, तंग कपडे आदि कारणांमुळेही होतो... हे तुम्ही नक्कीच टाळू शकता... पण, काही महिलांना हा त्रास या कारणांशिवायही होतो. त्यांच्यासाठी या सोप्या टीप्स...
गोड-नमकीनचं पदार्थांचं सेवन कमी करा
गोड - नमकीन पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगण्याचा त्रास वाढतो... तसंच यामुळे सुस्तीही वाढते. त्यामुळे, असे पदार्थ टाळून फळ आणि भाज्यांचा आहार घ्या.
घरगुती उपाय
पोट दुखी कमी करण्यासाठी २-३ आल्याचे तुकडे, ४ काळीमिरी, एक मोठी वेलची घेऊन त्याचा कूट करून घ्या... हे मिश्रण आता उकळत्या पाण्यात टाका... यात थोडी काळी चहा, दूध, साखर मिसळून घ्या... थोडं उकळल्यानंतर कोमट असतानाच हा काढा घ्या...
तेजपत्याचा काढा
तेजपत्याची काही पानं बारीक करून घ्या... आणि पाण्यात उकळून घ्या... हा काढा घेतल्यानंतर तुम्हाची पोटदुखी कमी होऊ शकेल.